Bookstruck

सुत्तनिपात 101

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

५१० कंखी वेचिकिच्छि आगमं (इति सभियो) | पञ्हे पुच्छितु अभिकंखमानो |
तेसन्तकरो भगवा१(१ म. – भवं भवाहि. रो.-भवाहि मे.) हि पुट्ठो | २( २ म., रो.-पञ्हे मे पुट्ठो अनुपुब्बं ......)अनुपुब्बं अनुधम्म व्याकरोहि मे ||१||

५११ दूरतो आगतोऽसि सभिया (इति भगवा) | पञ्हे पुच्छितुं अभिकंखमानो |
तेसन्तकरो भवामि पु३(३ रो.-ते, म.-तेसमन्त करोमि ते.)ट्ठो | ४(४ रो.- पञ्हे ते पुट्ठो अनुपुब्बं ... | म. पञ्हे पुठो अनुपुब्बं...|)अनुपुब्बं अनुधम्मं व्याकरोमि ते ||२||

५१२ पुच्छ मं सभिय पञ्हं | यं किंचि मनसिच्छसि |
तस्स तस्सेव पञ्हस्स | अहं अन्तं करोमि ते ति ||३||

मराठीत अनुवाद :-

५१०. संशय आणि शंका असलेला मी- असें सभिय म्हणाला प्रश्न विचारण्याच्या उद्देशानें आलों आहें. ते विचारले असतां तू माझे ते प्रश्न सोडव, व धर्माला अनुसरून, अनुक्रमें, त्यांचीं मला उत्तरें दे. (१)

५११. हे सभिया-असें भगवान् म्हणाला-तूं दूरच्या प्रदेशांतून प्रश्न विचारण्याच्या हेतूनें आला आहेस. ते विचारले असतां मी ते सोडवितों व धर्माला अनुसरून, अनुक्रमें, त्यांचीं तुला उत्तरें देतों. (२)

५१२. हे सभिया, जी काहीं तुझ्या मनांत इच्छा असेल तिला अनुसरून तूं मला प्रश्न विचार. तुझा जो जो प्रश्न असेल तो तो मी सोडवितों (३)

पाली भाषेत :-

अथ खो सभियस्स परिब्बाजकस्स एतदहोसि- अच्छरिय वत भो अब्भुंत वत भो, अब्भुतं वत भो, यावताऽहं अञ्ञेसु सभणेन गोतमेन ओकासकम्मं कतं ति अत्तमनो पमोदितो उदग्गो पीतिसोमनस्सजातो भगवन्तं पञ्हं पुच्छि-
५१३. किं पत्तिनमाहु भिक्खुनं (इति सभियो)| सोरतं१(१ रो.सोरत. अ.-सूरतं' ति पि.) केन कथं च दन्तमाहु |
बुध्दो ति कथं पवुच्चति | पुट्ठो मे भगवा व्याकरोहि ||४||

५१४. पज्जेन च भवं च विप्पहाय | वुसितवा खीणपुनब्भवो स भिक्खु ||५||

मराठीत अनुवाद :-

त्यावर सभिय परिव्राजकाला वाटलें कीं, इतर श्रमण-ब्राम्हणांनीं प्रश्न विचारण्यास मला सवड पण दिली नाही; असें असतां श्रमण गोतमानें आपणांला प्रश्न विचारण्याला मला सवड दिली हें मोठें आश्चर्य़, हें मोठें अदभुत होय. अशा प्रकारें हृष्ट, तुष्ट, उल्लसित आणि प्रीति-सौमनस्ययुक्त होऊन त्यानें भगवन्ताला प्रश्न विचारला-

५१३. कोणत्या गुणाच्या प्राप्तीनें भिक्षु होतो-असें सभिय म्हणाला-सुशांत कशामुळें होतो, दान्त कोणाला म्हणतात, व बुद्ध कसा होतो, हें मी विचारतों त्याचें, हे भगवन्, मला उत्तर दे. (४)

५१४. जो आपण तयार केलेल्या मार्गांनें – सभिया, असें भगवान् म्हणाला- परिनिर्वाणाला जातो, ज्याला शंका नाहीं, ज्यानें शाश्वत दृष्टी आणि उच्छेददृष्टि सोडून (ब्रम्हचर्याच्या मार्गाचें) आक्रमण केलेले आहे, व ज्याला पुनर्जन्म नाहीं, तो भिक्षु होय. (५)
« PreviousChapter ListNext »