Bookstruck

सुत्तनिपात 121

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेतः-

५९४ अनुञ्ञातपटिञ्ञाता तेविज्जा मयमस्मुभो१।(१ सी.-मयमस्सुभो.)
अहं पोक्खरसातिस्स तारुक्खस्सायं माणवो।।१।।

५९५ तेविज्जानं यदक्खातं तत्र केवलिनोऽस्मसे।
पदकस्मा वेय्याकरणा जपे२(२अ.-जप्पे.) आचरियसादिसा।।२।।

मराठीत अनुवाद
:-

५९४. आम्ही दोघे आचार्याकडून ‘त्रैविद्य’ म्हणून संमत असून त्याप्रमाणें आम्ही प्रकट निवेदनही करतों. मी पुष्करसादीचा व हा तारुक्ष्याचा विद्यार्थी आहे.(१)

५९५. त्रैविद्यांचें जें शिक्षण त्यांत आम्ही पारंगत आहोंत. पदांत, व्याकरणांत आणि जल्पांत१ (१ म्हणजे वेदांत. (टीका)) आम्ही आचार्यासारखे (प्रवीण) आहोंत.(२)

पाली भाषेतः-


५९६ तेसं नो जातिवादस्मिं विवादो अत्थि गोतम।
जातिया ब्राह्मणो होति भारद्वाजो ति भासति।
अहं च कम्मना१(१ म., सी.-कम्मुना.) ब्रूमि एवं जानाहि चक्खुम।।३।।

५९७ ते न सक्कोम सञ्ञुत्तं२(२म.-सञ्ञापेतु.) अञ्ञमञ्ञं मयं उभो।
भगवन्तं पुट्टुमागम्ह संबुद्धं इति विस्सुतं।।४।।

५९८ चन्दं यथा खयातीतं पेच्च पंजलिका जना।
वन्दमाना नमस्सन्ति एवं लोकस्मिं गोतमं।।५।।

५९९ चक्खुं लोके समुप्पन्नं मयं पुच्छाम गोतमं।
जातिया ब्राह्मणो होति उदाहु भवति कम्मना।
अजानतं नो पब्रूहि यथा जानेमु ब्राह्मणं।।६।।

मराठी अनुवादः-

५९६. हे गोतमा, त्या आमचा जाति१-वादासंबंधानें (१ ‘जन्म’ ह्या अर्थी हा शब्द वापरलेला दिसतो. विवाद आहे. जन्मानें ब्राह्मण होतो असें भारद्वाज म्हणतो व, हे चक्षुष्मन्, मी कर्मानें ब्राह्मण होतो असें म्हणतों, हें तूं समज.(३)

५९७. ते आम्ही दोघे परस्परांची समजूत घालूं शकत नाहीं. त्यासाठीं संबुद्ध म्हणून प्रसिद्ध असलेल्या भगवन्ताला विचारण्यास आम्ही आलों.(४)

५९८. (२अमावस्येच्या)(२-२ टीका-परिपूर्ण.) क्षयानंतर पुनरुदित होणार्‍या (बिजेच्या)२ चन्द्राला पाहून लोक जसे हात जोडून नमस्कार करतात तसेच ते या जगीं गोतमालाही करतात.(५)

५९९. तूं जगाचा चक्षु म म्हणून उत्पन्न झाला आहेस. यासाठी तुला विचारतों कीं, जन्मानें ब्राह्मण होतो कीं कर्मानें होतो? आम्हांस हें समजत नाहीं. तेव्हां ब्राह्मण कसा होतो हें आम्हांस समजावून सांग.(६)
« PreviousChapter ListNext »