Bookstruck

सुत्तनिपात 130

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेतः-

६४८ समञ्ञा हेसा लोकस्मिं नामगोत्तं पकप्पितं।
सम्मुच्चा१(१ म.-समञ्ञा.) समुदागतं तत्थ तत्थ पकप्पितं।।५५।।

६४९ दीघरत्तमनुसयितं दिट्ठिगतमजानतं।
अजानन्ता नो पबुन्ति२(२ रो.-पब्रुवन्ति.) जातिया होति ब्राह्मणो।।५६।।

६५० न जच्चा ब्राह्मणो होति न जच्चा होति अब्राह्मणो।
कम्मना३(३ म.-कम्मुना.) ब्राह्मणो होति कम्मना होति अब्राह्मणो।।५७।।

६५१ कस्सको कम्मना होति सिप्पिको होति कम्मना।
वाणिजो कम्मना होति पेस्सिको होति कम्मना।।५८।।

६५२ चोरोऽपि कम्मना होति योधाजीवोऽपि कम्मना।
याजको कम्मना होति राजाऽपि होति कम्मना।।५९।।

मराठी अनुवादः-


६४८. नांव आणि गोत्र हा एक जगांतला वाक्-प्रचार आहे. लोकसंमतीनें तें ठरतें, व त्या त्या ठिकाणीं तसें तसें कल्पिलें जातें. (५५)

६४९. अज्ञान माणसांच्या अन्त:करणांत चिरकाल वास करणारें असें हें एक मिथ्यादर्शन आहे. अज्ञ जन ‘जन्मानें ब्राह्मण होतो’ असें आम्हांस सांगतात. (५६)

६५०. जन्मानें ब्राह्मण होत नाहीं व जन्मानें अब्राह्मण होत नाहीं; कर्मानें ब्राह्मण होतो व कर्मानें अब्राह्मण होतो.(५७)

६५१. शेतकरी कर्मानें होतो, कारागीर कर्मानें होतो, वाणी कर्मानें होतो व शिपाई कर्मानें होतो. (५८)

६५२. चोरही कर्मानें होतो, योद्धाही कर्मानें होतो, याजक कर्मानें होतो व राजाही कर्मानें होतो. (५९)
« PreviousChapter ListNext »