Bookstruck

सुत्तनिपात 139

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेतः-

६८९ दिस्वा जटी कण्हसिरिव्हयो इसि। सुवण्णनेक्खं विय पण्डुकम्बले।
सेतं च छत्तं धरियन्त१(१ म.-धारयन्तं.) मुद्धनि। उदग्गचित्तो सुमनो पटिग्गहे।।११।।

६९० पटिग्गहेत्वा पन सक्यपुङ्गवं। जिगिंसको२(२ म.-जिगीसको.) लक्खणमन्तपारगू।
पसन्नचित्तो गिरमब्भुदीरयि। अनुत्तरायं दिपदानमुत्तमो।।१२।।

६९१ अथऽत्तनो गमनमनुस्सरन्तो। अकल्यरूपो गलयति३(३ म.-गरयति, अ.-‘गरयति’ इति पि.) अस्सुकानि।
दिस्वान सक्या इसिमवोचुं रुदन्तं। नो चे कुमारे भविस्सति अन्तरायो।।१३।।

मराठीत अनुवाद :-

६८९ पांढर्‍या शालीवर ठेवलेल्या सोन्याच्या नाण्याप्रमाणें शोभणार्‍या व ज्याच्या मस्तकावर श्वेत छत्र धरलें आहे, अशा त्याला पाहून हर्षित आणि सतुष्ट झालेल्या त्या जटाधारी ‘कृष्णश्री’ नांवाच्या ऋषीनें त्याला आपल्या हातांत घेतलें.(११)

६९० आणि लक्षणें आणि मंत्र जाणण्यांत पारंगत असलेल्या (त्या ऋषीनें) शाक्यपुंगवाला (बोधिसत्त्वाला) घेऊन व त्याची परीक्षा करून प्रसन्न चित्तानें असे उद्गार काढले—“हा लोकोत्तर बालक द्विपदांत उत्तम आहे.” (१२)

६९१ आणि आपलें इहलोकींतून (भविष्य कालांतील) जाणें ध्यानांत१ (१ ६९४ वी गाथा पहा.) आणून व दु:खित होऊन तो आसवें गाळूं लागला. त्या रुदन करणार्‍या ऋषीला पाहून शाक्य म्हणाले, या कुमाराला कांही अन्तराय नाहीं ना?(१३)

पाली भाषेतः-

६९२ दिस्वान सक्ये इसिमवोच अकल्ये। नाहं कुमारे अहितमनुस्सरामि।
न चापि मस्स भविस्सति अन्तरायो। न ओरकायं अधिमनसा भवाथ।।१४।।

६९३ संबोधियग्गं फुसिस्सतायं कुमरो। सो धम्मचक्कं परमविसुद्धदस्सी।
वत्तेस्सतायं बहुजनहितानुकंपी। वित्थारिकऽस्स भविस्सति ब्रह्मचरियं।।१५।।

६९४ ममं च आयु न चिरमिधावसेसो। अथऽन्तरा मे भविस्सति कालकिरिया।
सोहं न सुस्सं अ-सम-धुरस्स धम्मं। तेनऽम्हि १अट्टो(१ म.-अज्झो.) व्यसनगतो अघावी।।१६।।

मराठी अनुवादः-

६९२ दु:खित झालेल्या शाक्यांना पाहून ऋषि म्हणाला—या कुमाराला कांहीं अहित आहे असें मला वाटत नाहीं, किंवा याला कोणताही अन्तराय होणार नाहीं. हा सामान्य नव्हे. यासाठीं तुम्ही आनंदित रहा. (१४)

६९३ हा कुमार श्रेष्ठ असा संबोध प्राप्त करून घेईल. परम विशुद्ध (निर्वाणाचा) साक्षात्कार करून घेणारा तो बहुजनांच्या कल्याणाबद्दल कळवळा येऊन धर्मचक्राचें प्रवर्तन करील. यानें प्रवर्तिलेला ब्रह्मचर्याचा संप्रदाय लोकांत विस्तार पावेल. (१५)

६९४ पण माझें इहलोकीं आयुष्य थोडें राहिलें आहे, आणि तो (बुद्ध) होण्यापूर्वी मी मरणार आहे. तो मी त्या अप्रतिम धुरीणाचा धर्म ऐकूं शकणार नाहीं. त्यामुळें मी आर्त, व्यसनप्राप्त व दु:खी झालों आहें.(१६)
« PreviousChapter ListNext »