Bookstruck

सुत्तनिपात 143

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेतः-

७१२ अलत्थं यदिदं साधु नालत्थं कुसलामिति।
उभयेनेव सो तादि१(१ रो.- तादी.) रुक्खं ल उपनिवतति।।३४।।

७१३ स पत्तपाणि विचरन्तो अमूगो मूगसम्मतो।
अप्पं दानं न हीळेय्य दातारं नावजानिय।।३५।।

७१४ उच्चावचा हि पटिपदा समणेन पकासिता।
न पारं दिगुणं२(२ अ.- दुगुणं.) यन्ति न इदं एकगुणं मुतं।।३६।।

७१५ यस्स च विसता नत्थि छिन्नसोतस्स भिक्खुनो।
किच्चकिच्चप्पहीनस्स परिळाहो न विज्जति।।३७।।

७१६ मोनेय्यं ते उपञ्ञिस्सं (ति भगवा) खुरधारूपमो भवे।
जिव्हाय तालुं आहच्च उदरे संयतो सिया।।३८।।

मराठी अनुवादः-

७१२. ‘जर भिक्षा मिळाली तर चांगलें, न मिळाली तरी चांगलें.’ दोन्हींविषयीं तो समान राहतो, व (राहण्याच्या) झाडाखालीं येतो. (३४)

७१३. हातांत भिक्षापात्र घेऊन फिरणारा व मुका नसून मुक्यासारखा समजला जाणारा, अशा त्यानें अल्प भिक्षेचा तिरस्कार व दात्याचा अनादर करूं नये.(३५)

७१४. श्रमणानें (बुद्धानें) लहानमोठा रस्ता दाखविला आहे. संसाराच्या पार दोनदां जात नसतात, तरीपण तो पार एकाच टप्प्यांत प्राप्त होतो असें समजलें जात नाहीं.(३६)

७१५. ज्या भिक्षूला आसक्ति नाहीं, ज्यानें संसारस्त्रोत तोडले, व जो कृत्याकृत्यांपासून मुक्त झाला, त्याला परिदाह राहत नाहीं. (३७)

७१६. मी तुला मौनेय सांगतों-असें भगवान् म्हणाला-क्षुरधारेपासून (आपली जीभ राखून वस्तर्‍यावरील मध चाटणार्‍या माणसाप्रमाणें) सावध व्हावें; जीभ ताळूला लावून जेवणांत संयम बाळगावा. (३८)
« PreviousChapter ListNext »