Bookstruck

सुत्तनिपात 162

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेतः-

७९७ यदत्तनी१(१ सी., म.-नि.) पस्सति आनिसंस। दिट्ठे सुते सीलवते मुते वा।
तदेव सो तत्थ समुग्गहाय। निहीनतो पस्सति सब्बमञ्ञं२।।२।।(२ सी.-सब्बमञ्ञे.)

७९८ तं वाऽपि गन्थं कुसला वदन्ति। य३(३-३ सी.-यन्निस्सितो.) निस्सितो पस्सति हीनमञ्ञं।
तस्मा हि दिट्ठं व सुतं मुतं वा। सीलब्बतं भिक्खु न निस्सयेय्या।।३।।

७९९ दिट्ठिंऽपि लोकस्मिं४(४ म.-लोकस्मि.) न कप्पयेय्य। ञाणेन वा सीलवतेन वाऽपि
समो ति अत्तमननूपनेय्य। हीनो न मञ्ञेथ विसेसि५ ५वाऽपि।।४।।(५-५ सी., प.-विसेसि चाऽपि.)

८०० अत्तं पहाय अनुपादियानो। ञाणेऽपि सो निस्सयं नो करोति।
स वे वियत्तेसु६(६ अ.-वियुत्तेसु.,म.-द्वियत्तेसु, दियत्तेसु, दियत्थेसु.) न वग्गसारी। दिट्ठिंऽपि लो न पञ्चेति किञ्चि७।।५।।(७ अ.-कंचि.)

मराठी अनुवादः-

७९७. तो आपल्या पंथांतील दृष्ट, श्रुत, शीलव्रत अथवा अनुमित यांतच फायदा पाहतो, आणि त्यालाच चिकटून बसून इतर सर्व पंथांना हीन समजतो. (२)

७९८ ज्या दृष्टीच्या आसक्तीनें तो इतरांना ही समजतो ती एक ग्रन्थि आहे असें सुज्ञ म्हणतात. म्हणून भिक्षूनें दृष्ट, श्रुत, अनुमित किंवा शीलव्रत यांत आसक्त होऊं नये.(३)

७९९ या जगांत त्यानें ज्ञानानें शीलव्रतानें एकादी (सांप्रदायिक) दृष्टी प्राप्त होते अशी कल्पना करूं नये. मी इतरांच्या समान आहें, इतरांहून हीन आहे किंवा श्रेष्ठ आहे, अशीही तुलना करूं नये.(४)

८००. तो स्वीकृत१(आत्मदृष्टि असाही अर्थ घेतां येईल.) सोडून व उपादानविरहित होऊन ज्ञानामध्यें देखील आसक्त होत नाहीं. तो सांप्रदायिक लोकांत राहूनही संप्रदायानें वागत नाहीं, व तो कोणतीही दृष्टी पकडून बसत नाही.(५)
« PreviousChapter ListNext »