Bookstruck

सुत्तनिपात 165

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेतः-

८११ सब्बत्थ मुनि१(१ Fsb.-मुनी.) अनिस्सितो। न पियं कुब्बति नोऽपि अप्पियं।
तस्मिं परिदेवमच्छरं। पण्णे वारि यथा न लिप्पति।।८।।

८१२ उदबिंदु यथाऽपि पोक्खरे। पदुमे वारि यथा न लिप्पति२।(२ म., नि.-लिंपति.)
एवं मुनि नोपलिप्पति। यदिदं दिट्ठसुतं३ (३ म.-दिट्ठं.) मुतेसु वा।।९।।

८१३ धोनो न हि तेन मञ्ञति। यदिदं दिट्ठसुतं४(४ म.-दिट्ठं.) मुतेसु वा।
न५(५-५ म., Fsb.-नाञ्ञेन.) अञ्ञेन विसुद्धिमिच्छति। न हि सो रज्जति नो विरज्जती ति।।१०।।

जरासुत्तं निट्ठितं।

मराठी अनुवादः-


८११. सर्व पदार्थांत अनासक्त असा मुनि कोणाला प्रिय समजत नाहीं व अप्रियही समजत नाहीं. (कमलिनीच्या) पानाला जसें पाणी चिकटत नाहीं, त्याप्रमाणें त्याला शोक आणि मत्सर चिकटत नाहींत(८)

८१२. पाण्याचा थेंब जसा पुष्कराला किंवा पाणी कमलाला चिकटत नाहीं, त्याप्रमाणें मुनि दृष्ट, श्रुत किंवा अनुमित यांना चिकटत नाहीं.(९)

८१३. दृष्ट, श्रुत किंवा अनुमित यामुळें मी (कांहीं विशेष) आहे असें धूतपाप समजत नाहीं, किंवा तो दुसर्‍या उपायानेंही विशुद्धि मिळवूं पाहत नाहीं. कारण तो पदार्थांत अनुरक्तही होत नाहीं व विरक्तही होत नाहीं.(१०)

जरासुत्त समाप्त

पाली भाषेत :-

४५
[७. तिस्समेत्तेय्यसुत्तं]

८१४ मेथुनमनुयुत्तस्स (इच्चायस्मा तिस्सो१ (१ म.-तिस्समेत्तेय्यो.) मेत्तेय्यो) विघातं ब्रूहि मारिस।
सुत्वान तव सासनं विवेके सिक्खिस्सामसे२।।१।।(२ म.-सिक्खिसामसे.)

८१५ मेथुनमनुयुत्तस्स (मेत्तेय्या ति भगवा) मुस्सतेवापि सासनं।
मिच्छा च पटिपज्जति एतं तस्मिं अनारियं।।२।।

८१६ एको पुब्बे चरित्वान मेथुनं यो निसेवति।
यानं भन्तं व तं लोके हीनमाहु पुथुज्जतं।।३।।(३ सी.-कित्तिं. Fsb., नि.-कित्ती.)

मराठी अनुवादः-

४५
[७. तिस्समेत्तेय्यसुत्त]


८१४ हे मारिषा, स्त्रीसंग करणार्‍या माणसाला धोका कोणता हें सांग-असें तिष्य मैत्रेय म्हणाला-तुझा उपदेश ऐकून आम्ही एकान्तवास आचरण्याचें शिकूं.(१)

८१५ स्त्रीसंग करणार्‍याला केलेला उपदेश फुकट जातो-हे मैत्रेया, असें भगवान् म्हणाला-आणि तो खोट्या मार्गाला लागतो, ही त्याच्यांत वाईट गोष्ट होय.(२)

८१६ पूर्वी एकाकी राहून नंतर जो स्त्रीसंग करतो त्या पृथ रजनाला (योग्य मार्ग सोडून गेलेल्या) यानाप्रमाणें हीन समजतात.(६)
« PreviousChapter ListNext »