Bookstruck

सुत्तनिपात 170

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेतः-

८४० नो चे किर दिट्ठिया न सुतिया न ञाणेन(इति मागन्दियो) सीलब्बतेनापि विसुद्धिमाहु।
अदिट्ठिया अस्सुतिया अञ्ञाणा। असीलता अब्बता नोऽपि तेन मञ्ञेम१ऽहं(१ म., Fsb.-मञ्ञामहं.) मोमुहमेव धम्मं। दिट्ठिया एके पच्चेन्ति सुद्धिं।।६।।

८४१ दिट्ठिं२(२-२ नि.-दिडिसु.) च२ निस्साय अनुपुच्छमानो (मागन्दिया ति भगवा)। समुग्गहीतेसु पमोहमागा३।(सी.-सम्मोह म.-समोहमागम, पमोहमागमा.)
इतो च ४नादक्खि(४ रो.-नाद्दक्खि.) अणुंऽपि सञ्ञं। तस्मा तुवं मोमुहतो ५दहासि(५ म.-रहासि दक्खासि, दस्ससि.)।।७।।

मराठी अनुवादः-

८४० जर दृष्टीनें, श्रुतीनें आणि ज्ञानानें-असें मागन्दिय म्हणाला-किंवा शीलानें आणि व्रतानें शुद्धि नाहीं असें म्हणतोस, तसेच अदृष्टीनें, अश्रुतीनें, अज्ञानानें, अशीलानें आणि अव्रतानें ही जर शुद्धि नाहीं, तर मग मला वाटतें कीं हें सर्व केवळ तुझें अज्ञानच होय. (कारण), कित्येक (लोक) दृष्टीनें शुद्धि मिळते असें समजतात.(६)

८४१ सांप्रदायिक मतासंबंधीं विचारणारा तूं-हे मागन्दिया, असें भगवान् म्हणाला-लोकांनी स्वीकारलेल्या मतांत मोह पावलास; (म्हणून) मीं जें सांगतिलें तें तुला अणुमात्रही न समजल्यामुळें मी (जें म्हटलें तें) मोहमय आहें असें तूं समजतोस.(७)

पाली भाषेतः-

८४२ समो विसेसी उद वा १निहीनो(१ म.-विहीनो.)। यो मञ्ञति सो विवदेथ तेन।
तीसु विधासु अविकंपमानो। समो विसेसी ति न तस्स होति।।८।।

८४३ सच्चं ति सो ब्राह्मणो किं वदेय्य। मुसा ति वा सो विवदेथ केन।
यस्मिं समं विसमं २चापि(२ म., नि.-वाऽपि.) नत्थि। सो केन वादं पटिसंयुजेय्य।।९।।

८४४ ओकं पहाय अनिकेतसारी। गामे अकुब्बं मुनि सन्थवानि।
कामेहि रित्तो अपुरेक्खरानो३(३ म.-अपुरेक्खमानो.)। कथं न४( सी., नि.- ४नु.) विग्गय्ह जनेन कयिरा।।१०।।

मराठी अनुवादः-

८४२. जो आपणाला इतरांच्या समान, इतरांहून श्रेष्ठ किंवा हीन समजतो, तो त्यामुळें विवादांत पडेल. पण या तीनही प्रकारांत जो कंप पावत नाहीं त्याला आपण इतरांच्या समान किंवा इतरांहून श्रेष्ठ वाटत नाहीं.(८)

८४३ तो ब्राह्मण ‘हेंच काय तें सत्य’ असें कसें म्हणेल? किंवा ‘तें खोटें’ म्हणून वाद कसा करील? ज्याला आपण सम किंवा विषम आहों असें वाटत नाहीं, तो कोणाशीं वाद करील?(९)

८४४ घर सोडून अनागारिक भावानें चालणारा, गांवांतील लोकांशी सलगी न जोडणारा, कामोपभोगापासून विविक्त आणि कोणत्याही सांप्रदायिक मताचा पुरस्कार न करणारा मुनि लोकांशी वादविवाद करीत बसत नाहीं.(१०)
« PreviousChapter ListNext »