Bookstruck

सुत्तनिपात 172

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेतः-

८५१ निरासत्ति१(१ सी., म.-सन्ति, Fsb.-त्ती.) अनागते अतीतं नानुसोचति।
विवेकदस्सी फस्सेसु दिट्ठिसु च न निय्यति।।४।।

८५२ पतिलीनो२(२ म.-पटि.) अकुहको अपिहालु३(३ म.-युत्तो.) अमच्छरी।
अप्पगब्भो अजेगुच्छो पेसुणेय्ये च नो युतो।।५।।

८५३ सातियेसु अनस्सावी अतिमाने च नो युतो।
सण्हो च पटिभानवा न सद्धो न विरज्जति।।६।।

८५४ लाभकम्या४(४ म.-लोभ, कप्पा.) न सिक्खति अलाभे न५ च५ कुप्पति।(५-५ म.-चन,)
अविरूद्धो च तण्हाय रसे६(६-६ म., अ.-रसेसु.) च नानुगिज्झति।।७।।

मराठी अनुवादः-


८५१ त्याला अनागत वस्तूंची आसक्ति नाहीं, तो अतीत वस्तूंविषयीं शोक करीत नाहीं, तो विषयस्पर्शापासून मुक्तता जाणतो आणि तो सांप्रदायिक मतांनीं खेचला जात नाहीं.(४)

८५२ तो बाह्य जगापासून दूर, अदांभिक, नि:स्पृह, अमत्सरी, अप्रगल्भ, अजुगुप्सी असतो व चाहाडी करीत नाहीं.(५)

८५३ तो कामसुखाचा स्वत:वर पगडा बसूं देत नाहीं व अतिमान धरीत नाहीं; तो कोमल व प्रतिभासंपन्न असतो, आणि त्याला (साक्षात्कार झाल्यामुळें) श्रद्धेची आणि वैराग्याची गरज राहत नाहीं.(६)

८५४. तो लाभासाठी धर्म शिकत नाहीं; लाभ मिळाला नसतां रागावत नाहीं; आणि सर्वांशी अविरुद्ध होऊन तृष्णेत आणि रसांत लुब्ध होत नाहीं.(७)

पाली भाषेतः-

८५५ उपेक्खको१(१ रो.-उपेखको.) सदा सतो न लोके मञ्ञते समं।
न विसेसी न नीचेय्यो तस्स न सन्ति उस्सदा।।८।।

८५६ यस्स निस्सयता२(२ म., अ.-निस्सयना.) नत्थि ञत्वा धम्मं अनिस्सितो।
भवाय विभवाय वा तण्हा यस्स न विज्जति।।९।।

८५७ तूं ब्रूमि उपसन्तो ति कामेसु अनपेक्खिन३।(३ म.-अनुपेक्खनं, अनुनपेक्खनं, अनुपेक्खिनं.)
गन्था तस्स न विज्जन्ति अतारि४(४ म.-अतरि, अतरी.) सो विसत्तिकं।।१०।।

८५८ न तस्स पुत्ता पसवो खेत्तं वत्थुं न५(५ म.-च, सी.-वत्थुं.) विज्जति।
अत्तं६(६ म.-अत्ता, अत्थं.) वाऽपि निरत्तं७(७ म.-निरत्थं.) वा न तस्मिं उपलब्भति८।।११।।(८ म.-उपलिंपति.)

मराठी अनुवादः-

८५५ तो उपेक्षक, सदोदित स्मृतिमान्, आपणाला इतरांसमान, इतरांहून श्रेष्ठ किंवा नीच समजत नाहीं, आणि त्याला लोभादिक उत्सद१(१ ५१५ व्या गाथेवरील टीप पहा.) नाहींत.(८)

८५६ ज्याला आश्रितता नाहीं, धर्म जाणून जो अनाश्रित होतो आणि भवासाठीं (म्हणजे शाश्वत होण्यासाठी) किंवा अभवासाठी (म्हणजे उच्छेद प्राप्त करून घेण्यासाठीं) ज्याला तृष्णा राहिली नाहीं, (९)

८५७ त्या कामोपभोगांत अपेक्षारहित असणार्‍याला मी ‘उपशांत’ म्हणतों. त्याला ग्रन्थी राहिल्या नाहींत व तो विषक्तिका२(२ गाथा ७६८ वी पहा.) ओलांडून गेला आहे.(१०)

८५८ त्याला पुत्र नाहींत, पशु नाहींत, शेती किंवा घरदार नाहीं, व त्यानें स्वीकारलेलें३(३ गाथा ७८७ व त्यावरील टीप पहा.) किंवा धिक्कारिलेलें असें कांही नाहीं.(११)
« PreviousChapter ListNext »