Bookstruck

सुत्तनिपात 192

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

९७३ चुदितो वचीहि सतिमाऽभिनन्दे। सब्रह्मचारीसु खिलं पभिन्दे।
वाचं पमुञ्चे कुसलं नातिवेलं। जनवादधम्माय न चेतयेय्य।।१९।।

९७४ अथापरं पञ्च रजानि लोके। येसं सतीमा विनयाय सिक्खे।
रूपेसु सद्देसु अथो रसेसु। गन्धेसु फस्सेसु सहेथ रागं।।२०।।

९७५ एतेसु धम्मेसु विनेय्य छन्दं। भिक्खु सतीमा सुविमुत्तचित्तो।
कालेन सो सम्मा धम्मं परिवीमंसमानो। एकोदिभूतो विहने तमं सो ति (भगवा ति)।।२१।।

सारिपुत्तसुत्तं१ निट्ठितं। (१ अ.-शेरपञ्हसुत्त ति पि.)
अट्ठकवग्गो चतुत्थो।

मराठीत अनुवाद :-

९७३ त्या स्मृतिमन्तानें आपले दोष दाखवून देणारांचें अभिनंदन करावें; सब्रह्मचार्‍याविषयीं कठोरता बाळगूं नये; प्रसंगावधानानें चांगलेच शब्द बोलावेत; व लोकांच्या वादविवादांत शिरण्याची इच्छा धरूं नये. (१९)

९७४ आणि तदनंतर जे जगांत पांच प्रकारचे रज आहेत, त्यांचा नाश करण्यास स्मृतिमन्तानें शिकावें. (म्हणजे) रूप, शब्द, रस, गन्ध, आणि स्पर्श यांचा लोभ जिंकावा.(२०)

९७५ या पदार्थांचा छंद सोडून तो स्मृतिमान्, सुविमुक्तचित्त, वेळींच सद्धर्माचें चिन्तन करणारा, व एकाग्रता पावलेला भिक्षु अंधकाराचा नाश करण्यास समर्थ होईल (असें भगवान् म्हणाला.) (२१)

सारिपुत्तसुत्त समाप्त

अट्ठकवग्ग चौथा
« PreviousChapter ListNext »