Bookstruck

सुत्तनिपात 195

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

९८६ उत्रस्तं दुक्खितं दिस्वा देवता १(१म.-मत्थकामिनी.)अत्थकामिनी।
बावरिं उपसंकम्म इदं वचनमब्रवी।।११।।

९८७ न सो मुद्धं२(२ म.-बुद्धं.)पजानाति कुहको सो धनत्थिको।
मुद्धनि मुद्धपाते३(३म.-मुद्धाधिपाते) वा४(४म.-च.) ञाणं तस्स न विज्जति।।१२।। 

९८८ भोती५(म.-भोति.) चरहि जानाति तं मे अक्खाहि पुच्छिता।
मुद्धं मुद्धाधिपातं च तं सुणोमि वचं तव।।१३।।

९८९ ६ (६म.-सुण अहं एतं.) अहंऽपेतं न जानामि ञाणं मे त्थ७(७म.-एत्थ) न विज्जति।
मुद्धं८ मुद्धातिपातो८( ८-८ म.-मुद्धनि मुद्धातिपाते.) च जिनानं९(९सी.-जनानं.) हेत१०(१०म.-हत्थ, हेत्थ.) दस्सनं।।१४।।

मराठीत अनुवाद :-


९८६ उत्रस्त आणि दु:खित झालेल्या बावरीला पाहून त्याची हितेच्छु देवता त्याजपाशीं येऊन म्हणाली—(११)

९८७ “तो ब्राह्मण डोकें म्हणजे काय, हें जाणत नाहीं. तो दांभिक व धनलोभी होय. त्याला डोक्याविषयीं व डोक्याच्या फुटण्याविषयीं ज्ञान नाहीं.”(१२)

९८८ (बावरि-) भवति देवते, तर मग हें तूं जाणत आहेस; आणि मी हेंच तर विचारीत आहे; तेव्हां तें मला सांग. डोकें आणि डोक्याचें फुटणें कोणतें हें तुजपासून मला ऐकूं दे.(१३)

९८९ (देवता-) मी देखील तें जाणत नाहीं. त्याचें मला ज्ञान नाहीं. कारण डोकें आणि डोकें फुटणें हें जिन तेवढे जाणतात.(१४)

पाली भाषेत :-

९९० अथ को चरहि जानाति अस्मिं पुथविमण्डले१। (१ म.-पथवि.)
मुद्धं मुद्धाधिपातं२(२ म.-मद्धातिपातं.) च तं मे अक्खाहि देवते।।१५।।

९९१ पुरा कपिलवत्थुम्हा निक्खन्तो लोकनायको।
अपच्चो ओक्काकराजस्स सक्यपुत्तो पभंकारो।।१६।।

९९२ सो हि ब्राह्मण सम्बुद्धो सब्बधम्मान पारगू।
सब्बाभिञ्ञाबलप्पत्तो सब्बधम्मेसु चक्खुमा।
सब्बधम्मक्खयं३(३म.-सब्बतम्मक्खयं) पत्तो विमुत्तो उपधिसंखये४( ४म.-उपधिक्खये)।।१७।।

९९३ बुद्धो सो भगवा लोके धम्मं देसेति५ (५म. देसेसि.) चक्खुमा।
तं त्वं६(६सी.-तं.) गन्त्वान पुच्छस्सु सो ते तं व्याकरिस्सति७(७म. ब्याकरिस्सति.)।।१८।।

मराठीत अनुवाद :-

९९० (बावरि-) तर मग या पृथ्वीमंडलावर डोकें आणि डोकें फुटणें म्हणजे काय हें जाणणारा कोण आहे तें, हे देवते, मला सांग. (१५)

९९१ (देवता-) कपिलवस्तुनगराहून निघालेला लोकनायक, इक्ष्वाकुराजवंशज व (जगाला) प्रकाशित करणारा असा शाक्यपुत्र आहे. (१६)

९९२ हे ब्राह्मणा, तो संबुद्ध, सर्व धर्मांत पारंगत, सर्वाभिज्ञाबल पावलेला, सर्व धर्मांविषयीं डोळस, सर्व धर्मांच्या अन्ताला गेलेला आणि उपाधींचा नाश करून मुक्त झालेला आहे. (१७)

९९३. तो चक्षुष्मान्, बुद्ध, भगवान् लोकांना धर्मोपदेश करीत आहे. तेथें जाऊन त्याला हे विचार, म्हणजे तो तें तुला समजावून सांगेल.(१८)
« PreviousChapter ListNext »