Bookstruck

सुत्तनिपात 208

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

५९
[५. मेत्तगूमाणवपुच्छा (४)]


१०४९ पुच्छामि तं भगवा ब्रूहि मे तं (इच्चायस्मा मेत्तगू)। मञ्ञामि तं वेदगुं भावितत्तं।
कुतो नु दुक्खा१(१ सी., Fsb-दुक्खाय.)(२ नि.-समुपागता, सी., Fsb-सदा गता.)समुदागता इमे। ये केचि लोकस्मिं३ (३म., Fsb-लोकस्मि.)अनेकरूपा।।१।। 

१०५० दुक्खस्स वे४(४म.-चे.) मं पभवं अपुच्छसि। (मेत्तगू ति भगवा)। तं ते पवक्खामि यथा पजानं।
उपधीनिदाना पभवन्ति दुक्खा। ये केचि लोकस्मिं अनेकरूपा।।२।।

५९
[५. मेत्तगूमाणवपुच्छा (४)]

मराठीत अनुवाद :-


१०४९ हे भगवन्, तुला मी वेदपारग आणि भावितात्म समजतों; - असें आयुष्मान् मेत्तगू म्हणाला - म्हणून, हे भगवन्, मी तुला विचारतों तें सांग. जीं या जगांत अनेकविध दुःखें आहेत, तीं कोठून उत्पन्न होतात? (१)

१०५० जर तूं मला दुःखाची उत्पत्ति विचारतोस — हे मेत्तगू असें भगवान् म्हणाला — तर ती मला ठाऊक आहे त्याप्रमाणें मी तुला सांगतों. जीं या जगांत अनेकविध दु:खें आहेत, तीं उपाधीपासून उत्पन्न होतात. (२)

पाली भाषेत :-


१०५१ यो वे अविद्वा उपधिं करोति। पुनप्पुनं दुक्खमुपेति मन्दो।
तस्मा हि१(१-१ अ., म.-पजानं.) १जानं उपधिं न कयिरा। दुक्खस्स जातिप्पभवानुपस्सी।।३।।

१०५२ यं तं अपुच्छिम्ह अकित्तयी नो। अञ्ञं तं पुच्छामि२(२ नि.; म.-पुच्छाम.) तदिघ ब्रूहि।
कथं नु धीरा वितरन्ति ओघं। जातिजरं सोकपरिद्दवं३(३म.-परिदेवं.) च।
तं मे मुनि४(४रो.- मुनी.) साधु वियाकरोहि। तथा५ (५सी.- यथा.) हि ते विदितो एक धम्मो।।४।।

१०५३ कित्तयिस्सामि६(६म.-कित्तयिस्साम.) ते धम्मं (मेत्तगू ति भगवा) दिट्ठे७(७म.-दिट्ठे व।) धम्मे अनीतिहं। 
यं विदित्वा सतो चरं। तरं लोके विसत्तिकं।।५।।

मराठीत अनुवाद :-

१०५१ जो अविद्वान् उपाधि जोडतो, तो पुनः पुनः दुःख भोगतो. म्हणून दुःखाचें उत्पत्तिकारण पाहणार्‍या जाणत्या माणसानें उपाधि जोडूं नये. (३)

१०५२ जें मीं विचारलें, तें तूं सांगितलेंस. आतां दुसरें विचारतों तें सांग. सुज्ञ जन ओघ, जन्म, जरा, शोक आणि परिदेव कसे तरून जातात तें, हे मुने, मला नीट समजावून सांग. कारण, हा धर्म तुला चांगला माहीत आहे. (४)

१०५३ जो परंपरागत नसून, माणसाच्या आयुष्यांत (प्रत्यक्ष फलदायक) - हे मेत्तगू, असें भगवान् म्हणाला - आणि ज्याचें ज्ञान होऊन, स्मृतिमान् होऊन वागणारा मनुष्य या जगांत तृष्णेच्या पार जातो, तो धर्म मी तुला सांगतों. (५)
« PreviousChapter ListNext »