Bookstruck

सुत्तनिपात 217

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पाली भाषेत :-

६४
[१०. तोदेय्यमाणवपुच्छा (९)]


१०८८ यस्मिं कामा न वसन्ति१(१ म.-सवन्ति ) (इच्चायस्मा तोदेय्यो) तण्हा यस्स न विज्जति।
कथंकथा च यो तिण्णो विमोक्खो तस्स कीदिसो।।१।।

१०८९ यस्मिं कामा न वसन्ति (तोदेय्या ति भगवा) तण्हा यस्स न विज्जति।
कथंकथा च यो तिण्णो विमोक्खो तस्स नापरो।।२।।

१०९० निरासयो२(२ सी., म., Fsb.-निराससो, नि.-निरासंसो. ) सो उद आससानो३(३ म.- आसमानो )। पञ्ञाणवा सो उद पञ्ञकप्पी।
मुनिं अहं सक्क यथा विजञ्ञं। तं मे वियाचिक्ख समन्तचक्खु।।३।।

६४
[१०. तोदेय्यमाणवपुच्छा (९)]

मराठीत अनुवाद :-


१०८८ ज्याला कामोपभोग नाहींत - असें आयुष्मान् तोदेय्य म्हणाला — ज्याला तृष्णा नाहीं, व जो शंकांच्या पार गेला त्याचा मोक्ष कशा प्रकारचा? (१)

१०८९ ज्याला कामोपभोग नाहींत — हे तोदेय्या, असें भगवान् म्हणाला — ज्याला तृष्णा नाहीं व जो शंकांच्या पार गेला, त्याला मोक्ष असा दुसरा पदार्थ राहिला नाहीं. (तोच त्याचा मोक्ष). (२)

१०९० हे समन्तचक्षु शाक्या, तो आसक्तिरहित झाला की त्याच्या ठिकाणीं आसक्ति आहे? तो प्रज्ञावान् कीं प्रज्ञेची कल्पना करणारा मुनि? हें मला समजेल अशा रीतीनें सांग. (३)
« PreviousChapter ListNext »