Bookstruck

सुत्तनिपात 226

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

११२५ तोदेय्यकप्पा दुभयो जातुकण्णी च पण्डितो।
भद्रावुधो उदयो च पोसालो चापि ब्राह्मणो।
मोघराजा च मेधावी पिंगियो च महा इसि।।२।।

११२६ एते बुद्धं उपागञ्छुं१( १ म.-गच्छुं. ) संपन्नचरणं इसिं।
पुच्छन्ता निपुणे पञ्हे बुद्धसेट्ठं उपागमुं।।३।।

११२७ तेसं बुद्धो व्याकासि२(२ म. - ब्या, Fsb.-वियाकासि. ) पञ्हे पुट्ठो यथातथं।
पञ्हानं ३(३ Fsb.-वेय्यकरणे. )वेय्याकरणेन तोसेसि ब्राह्मणे मुनि।।४।।

११२८ ते तोसिता चक्खुमता बुद्धेनादिच्चबन्धुना।
ब्रह्मचरियमचरिंसु४( ४ म. – अचा  ) वरपञ्ञस्स सन्तिके।।५।।

११२९ एकमेकस्स पञ्हस्स यथा बुद्धेन देसितं।
तथा यो पटिपज्जेय्य गच्छे पारं अपारतो।।६।।

मराठीत अनुवाद :-

११२५ तोदेय्य आणि कप्प हे दोघे, आणि पंडित जातुकण्णि, भद्रावुध, उदय आणि ब्राह्मण पोसाल, मेधावी मोघराजा आणि महर्षि पिंगिय — (२)

११२६ हे सदाचारसंपन्न ऋषीपाशीं, बुद्धापाशीं, आले आणि त्यांनीं बुद्ध - श्रेष्ठाला मार्मिक प्रश्न विचारले. (३)

११२७ बुद्धानें त्यांच्या प्रश्नांचीं यथायोग्य उत्तरें दिलीं. त्या मुनीनें योग्य उत्तरें देऊन ब्राह्मणांना सन्तुष्ट केलें. (४)

११२८ आदित्यबन्धु चक्षुष्मान् बुद्धानें संतुष्ट केलेले ते ब्राह्मण त्या श्रेष्ठ - प्रज्ञापाशीं ब्रह्मचर्य आचरते झाले. (५)

११२९ बुद्धानें दिलेल्या उत्तरांपैकीं एकाही उत्तराला अनुसरून जो चालेल, तो (संसाराच्या) अलीकडल्या तीरापासून पलीकडल्या तीराला जाईल. (६)
« PreviousChapter ListNext »