Bookstruck

*संघ 27

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
सुत्तपिटक, विनयपिटक, आणि अभिधम्मपिटक असे याचे मुख्य तीन भेद आहेत. त्यांचे पोटभेद खालीं दिल्याप्रमाणें:-

सुत्तपिटक

१ दीघनिकाय
२ मज्झिमनिकाय
३ संयुत्तनिकाय
४ अंगुत्तरनिकाय
५ खुद्दकनिकाय

सुत्तपिटकाचे हे पांच मुख्य भाग. यांपैकीं खुद्दकनिकायाचे पुन: १५ पोटविभाग आहेत. ते हे:-

१ खुद्दकपाठ
२ धम्मपद
३ उदान
४ इतिवुत्तक
५ सुत्तनिपात
६ विमानवत्थु
७ पेतवत्थु
८ थेरगाथा
९ थेरीगाथा
१० जातक
११ निद्देस
१२ पटिसंभिदामग्ग
१३ अपदान
१४ बुद्धवंश
१५ चरियापिटक

विनयपिटकाचे पांच भाग आहेत, ते हे:-


१ पाराजिका
२ पाचित्तियादि
३ महावग्ग
४ चुल्लवग्ग
५ परिवारपाठ

अभिधम्मपिटकांत सात प्रकरणें आहेत, तीं ही:-

१ धम्मसंगणि
२ विभंग
३ धातुकथा
४ पुग्गलपञ्ञत्ति
५ कथावत्थु
६ यमक
७ पट्ठान

या त्रिपिटक ग्रंथावर सिंहल भाषेंत टीका लिहिल्या होत्या. त्यांनां अठ्ठकथा (अर्थकथा) असें म्हणत. इ. स.च्या पांचव्या शतकाच्या आरंभी बुद्धघोषाचार्याने या अट्ठकथांचें पालिभाषेंत रुपांतर केलें. दीघनिकायदि चार निकायांच्या अट्ठकथांच्या आरंभी प्रस्तावनेंत खालील गाथा आढळतात:-
« PreviousChapter ListNext »