Bookstruck

गाढव व त्याचा मालक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक लोणारी आपले गाढव रस्त्याने हाकीत चालला असता ते मध्येच रस्ता सोडून भलत्याच वाटेने जाऊ लागले व लवकरच एका डोंगराच्या कड्यावर आले, तेथून ते लवकरच खाली पडणार, इतक्यात त्याचा मालक चटकन त्याच्याजवळ गेला व त्याचे शेपूट धरून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्‍न करू लागला. पण गाढव हट्टाने पुढेच ओढू लागले. मग निरुपाय होऊन लोणार्‍याने त्याचे शेपूट सोडून दिले व तो म्हणाला, 'अरे, इतके दिवस तू माझ्या आज्ञेत होतास, तोपर्यंत तुझं रक्षण मी केलं पण आता तू स्वतंत्र होऊन वाटेल तसं वागू लागलास, यामुळे तुझा जीव जर धोक्यात पडला तर त्याबद्दलची जबाबदारी माझ्यावर नाही.'

तात्पर्य

- जोपर्यंत आपला माणूस आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत त्याच्या सुखासाठी माणूस झटतो पण जेव्हा तो अनावर होऊन स्वच्छंदीपणाने वागू लागतो तेव्हा तो त्याचा तिरस्कार करू लागतो.

« PreviousChapter ListNext »