Bookstruck

माशा, मधमाशा व गांधिलमाशी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

काही माशा एका मधमाशांच्या पोळ्यात शिरल्या व म्हणू लागल्या की, हा मध आमचा आहे. मग त्यांचे व मधमाशांचे भांडण सुरू झाले तेव्हा त्या एका गांधिलमाशीकडे न्याय मागायला गेल्या. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन गांधिलमाशी म्हणाली, 'तुम्ही दोन्ही जातीच्या माशा जवळजवळ सारख्याच दिसता, त्यामुळे न्याय देणे थोडं अवघड दिसतं. तेव्हा तुम्ही दोन्ही पक्षांच्या माशांनी एक एक रिकाम पोळ घेऊन त्यात मध तयार करून तो माझ्याजवळ घेऊन या, म्हणजे तुमच्या मधाची चव आणि रंग पाहून या पोळ्यातला मध कोणाचा ते मी सांगेन.' ही गोष्ट मधमाशांनी लगेच मान्य केली, पण साध्या माशा ती टाळण्याचा प्रयत्‍न करू लागल्या. ते पाहून गांधिलमाशी साध्या माशांना म्हणाली, 'तुम्ही खोटं बोलता, हा मध तुमचा नसून मधमाशांचाच आहे.'

तात्पर्य

- परीक्षेची वेळ आली म्हणजे लबाडी बाहेर पडल्याशिवाय रहात नाही.

« PreviousChapter ListNext »