Bookstruck

गरुडाचे सौंदर्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा पक्ष्यांमध्ये सर्वात अधिक सुंदर कोण असा वाद सुरू झाला. तेव्हा पक्ष्यांचा राजा गरुड ह्याने स्वतःच्या बाजूचे मत देऊन 'आपणच सर्वात अधिक सुंदर !' असे सत्तेच्या जोरावर ठरवून घेतले. तेव्हा एक मोर त्याला न भिता म्हणाला, 'ठीक आहे ! तू सर्वात सुंदर आहेस यात संशय नाही, पण हे तुझं सौंदर्य तुझ्या चोचीत आणि पंजात आहे नि त्यामुळे तू दिलेल्या निकालाचा खरेखोटेपणा आम्हाला विचारता येत नाही !

तात्पर्य

- बलवान माणसाला लोक जो मान देतात तो बुद्धीपेक्षा भीतीमुळेच अधिक असतो.

« PreviousChapter ListNext »