Bookstruck

माणूस व गाढव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एका धीट व साहसी माणसाने दुसर्‍या माणसाबरोबर एकदम अशी पैज मारली की, दहा वर्षात आपण गाढवाला लिहिण्यास, वाचण्यास व हिशेब करण्यास शिकवू. त्या माणसाचा एक मित्र तेथे होता, तो त्याला म्हणाला, 'अरे, तुला वेड तर नाही लागलं. दहा वर्ष सोडून तू जरी शंभर वर्ष सारखा प्रयत्‍न केलास तरी गाढव लिहिणं, वाचणं शिकणार आहे काय ?' पैज मारणारा यावर उत्तरला, 'मित्रा, तू काही काळजी करू नकोस, कारण दहा वर्षे हा काळ काही थोडा नाही. एवढ्या काळात मी, हा माणूस किंवा ते गाढव यापैकी कोणीतरी नक्की मेल्याशिवाय राहणार नाही. तसं झाल्यावर मला पैज हरण्याचा प्रसंगच येत नाही.'

« PreviousChapter ListNext »