Bookstruck

कोंबड्या व पेंढ्या भरलेला कोल्हा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका शेतकर्‍याने आपल्या कोंबड्यांच्या जागेजवळ एक पेंढा भरलेला कोल्हा होता. हेतू हा की, जिवंत कोल्हे त्याला पाहून पळून जावेत. एका कोंबड्याने तो कोल्हा पाहिला व त्याला इतकी भिती वाटली की तो लांब एका कोपर्‍यात जाऊन लपून बसला. ते पाहून इतर कोंबड्या त्याला हसू लागल्या. तेव्हा तो कोंबडा म्हणाला, 'तुम्ही, मी काय म्हणतो ते ऐकाल का? ह्या पेंढा भरून ठेवलेल्या कोल्ह्याप्रमाणे जिवंत कोल्हेही जगात आहेत कारण कालच एक कोल्हा माझ्या मानेवर बसला होता अन् त्याच्या तावडीतून मी मोठ्या मुष्किलीने सुटलो. असाच अनुभव तुम्हाला आला असता तर त्याचं नुसतं पाऊल उमटलेलं पाहून तुम्ही पळून गेला असतात, मग पेंढा भरलेला कोल्हा पाहिल्यावर तुमची स्थिती काय झाली असती हे सांगायलाच नको !'

तात्पर्य

- गरम दूध पिऊन तोंड भाजल्यावर माणूस ताकसुद्धा फुंकून पिऊ लागतो.

« PreviousChapter ListNext »