Bookstruck

कोल्हा आणि काटेझाड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका कोल्ह्याच्या मागे एक कुत्रा लागला म्हणून कोल्हा जोरात पळत सुटला. पळता पळता एका कुंपणावर उडी मारीत असता त्याने एका काट्यांच्या झाडाचा आधार घेतला. त्यामुळे त्याच्या हातापायास काटे अडकून तो तेथेच अडकून पडला.

त्यावेळी तो त्या काटेझाडाला रागारागाने म्हणाला, 'अरे, मी संकटात होतो म्हणून तुझ्या आश्रयाला आलो तर तू क्रूरपणे वागतोस हे काही योग्य नाही.' त्यावर काटेझाडाने उत्तर दिलं, 'अरे, तू मला खुशाल झोंबाव आणि मी ते अगदी मुकाटपणे सहन करावं असं तुला का वाटतं ? वास्तविक पाहता, दुसर्‍याला झोंबण्याचा हक्क आमच्यासारख्या काटेझाडांना आहे, इतरांना नाही म्हणून यानंतर तू हे लक्षात ठेव की, कधीही काटेझाडांच्या वाटेस जाऊ नको.'

तात्पर्य

- जे दुष्ट असतात ते विनाकारण दुसर्‍याला त्रास देऊ लागतात, परंतु एखादे वेळी त्याला सवाई भेटतो व त्याची खोड मोडतो.

« PreviousChapter ListNext »