Bookstruck

करडू आणि लांडगा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक करडू मेंढ्याच्या कळपातून चुकून मागे राहिले असता, एका लांडग्याने त्याचा पाठलाग केला, तेव्हा त्याला चुकविण्यासाठी ते एका देवळात जाऊन बसले. तेव्हा निरुपाय होऊन लांडगा कपटाने म्हणाला, 'अरे मूर्खा ! तुला आपल्या जीवाची काहीच कळजी वाटत नाही का ? आता या देवाचा पुजारी इथे आला नि तुला देवापुढे बळी देऊ लागला तर तू आपलं रक्षण कसं करशील ?' त्यावर करडू म्हणाले, 'बाबा रे, पुजार्‍याने जर मला देवापुढे बळी दिलं तरी तुझ्या भक्ष्यस्थानी पडण्यापेक्षा ते शतपट चांगलं, असं मी समजतो.'

तात्पर्य

- जो एकवेळ आपला नाश करण्याची संधी पहात होता व ती न सापडल्यामुळे जो नंतर आपल्या हिताची गोष्ट सांगू लागला, तो पक्का मतलबी आहे असे समजून शहाण्याने त्याच्यापासून दोन पावले दूर राहावे हे चांगले.

« PreviousChapter ListNext »