Bookstruck

काळा माणूस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पूर्वी काही देशात गुलामांचा व्यापार चालत असे, त्या वेळी एकदा एका गोर्‍या माणसाने एक काळा गुलाम विकत घेतला. त्याचा काळेपणा पाहून त्याला वाटले की, त्याच्या घाणेरडेपणामुळे त्यांच्या अंगावर मळ साचून तो काळा दिसतो आहे. त्याला चांगली अंघोळ घातली व मळ धुवून काढला तर तो आपल्याप्रमाणेच गोरा दिसू लागेल. म्हणून त्याने नोकराकडून साबण, शिकेकाई इ. लावून व दगडाने त्याचे अंग घासून त्याच्या डोक्यावर सारखी धार धरली. असे दिवसातून चारपाच वेळा केले. याचा परिणाम असा झाला की, तो माणूस गोरा तर झाला नाहीच, पण उलट थंडीने हातपाय गारठून आजारी पडला व प्राणास मुकला.

तात्पर्य

- नैसर्गिक व्यंग काढून टाकण्याचे काम माणसाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे.

« PreviousChapter ListNext »