Bookstruck

शेतकरी आणि चिमण्या

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका शेतकर्‍याने आपल्या शेतात नुकतेच बी टाकले होते, ते काही चिमण्या येऊन टिपू लागल्या. त्यांना हाकलून लावण्यासाठी शेतकर्‍याने गोफणीत दगड न घालता ती नुसतीच काही वेळ फिरविली. गोफणीत दगड नाहीत, हे लक्षात येताच चिमण्या न भिता तेथेच बसल्या व त्यांनी बी वेचून खाण्याचा सपाटा चालविला. हे पाहून शेतकर्‍याने गोफणीत दगड घालून ती जोराने फेकण्यास सुरुवात केली. तेव्हा दगड लागून काही चिमण्या मरून पडल्या. ते पाहून एक चिमणी इतरांना म्हणाली, 'आता इथून लवकर पळावं हेच बरं, कारण आता नुसता बाऊ न दाखवता आपल्याला चांगलं शासन करावं असा त्या शेतकर्‍यानं निश्चय केलेला दिसतो.'

तात्पर्य

- एखाद्यास आपला राग आला असून तो आता आपणास शिक्षा करणार हे समजताच आपण निघून जावे हे चांगले. तसे न करता उलट हट्टाने तेथेच राहिल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही.

« PreviousChapter ListNext »