Bookstruck

मोठे झाड व लहान झाड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वार्‍याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वार्‍याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?' त्यावर लहान झाडाने उत्तर दिलं, 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वार्‍यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'

तात्पर्य

- समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे, तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते बर्‍याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.
« PreviousChapter ListNext »