Bookstruck

कबुतर व मुंगळा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका मुंगळ्याला फार तहान लागली म्हणून तो पाणी पिण्यासाठी एका ओढ्यावर गेला असता पाण्यात पडून वाहू लागला. ती त्याची स्थिती एका कबुतराने पाहिली, तेव्हा त्याची दया येऊन त्याने आपल्या चोचीने एक झाडाचे पान तोडून ते पाण्यात टाकले व त्याच्या आधाराने मुंगळा सुरक्षितपणे कडेला आला. पुढे काही दिवस गेल्यावर एके दिवशी कबुतराला पकडण्यासाठी एक पारधी जाळे घालू लागला. त्यावेळी मुंगळा जवळच होता. तो प्रकार पाहताच हळूच जाऊन त्याने पारध्याच्या पायाचा चावा घेतला. त्या वेदनेने त्याने एकदम हातपाय झाडले, त्याचा आवाज ऐकून कबुतर सावध झाले आणि उडून गेले.

तात्पर्य

- माणसाने उपकार करीत असावे म्हणजे प्रसंगी एखादा क्षुल्लक माणूसही ते उपकार स्मरून उपकारकर्त्यास मोठ्या संकटातून सोडवील.
« PreviousChapter ListNext »