Bookstruck

शेतकरी व त्याचा नोकर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका शेतकर्‍याचा बैल त्याच्या शेतातून हरवला म्हणून त्याने आपल्या नोकराला त्याला शोधायला पाठविले. त्या मूर्ख नोकराने त्याचा पाठलाग करत शेवटी त्याला एका अरण्यात गाठले. वाटेत रस्त्यावरून तीन पक्षी उडत गेले. त्यांच्यामागून तो नोकरही धावत गेला. त्याला तिकडे इतका वेळ लागला की मालकाला त्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले. मग तो स्वतः शेतात जाऊन पाहतो तो नोकर आकाशाकडे पाहात सारखा धावत सुटला आहे असे त्याला दिसले. म्हणून त्याला शेतकर्‍याने विचारले, 'काय रे, काय बातमी आहे?' नोकर म्हणाला, 'अहो, ते मिळाले का !' शेतकरी म्हणाला, 'अरे कोण?' तो मूर्ख नोकर म्हणाला, 'पहा हे तीन पक्षी येथे उडताहेत, पण मला काही ते पकडता येईनात.'

ते ऐकून शेतकर्‍याने त्याला चांगलाच मार दिला. आपले नेमून दिलेले काम सोडून भलत्या गोष्टीच्या नादी न लागण्याचे त्याला बजावले.

तात्पर्य

- बरेच लोक क्षुल्लक गोष्टीच्या मागे लागून आपले कर्तव्य बजाविण्याचे सोडून देतात.
« PreviousChapter ListNext »