Bookstruck

शेतकरी व साप

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका शेतकर्‍याने थंडीचे दिवस असताना कुंपणाजवळ पडलेला एक साप पाहिला. तो थंडीमुळे अगदी मरायला टेकला होता. ते पाहून शेतकर्‍याला त्याची दया आली. म्हणून त्याने त्या सापाला घरी नेऊन विस्तवाजवळ ठेवले.

तेथे थोडी ऊब मिळताच सापाला हुशारी आली व तो मोठमोठ्याने फूत्कार करून शेतकर्‍याच्या बायकापोरांच्या अंगावर उड्या मारू लागला. त्या वेळी शेतकर्‍याची बायकापोरे जोराने ओरडू लागली. तो ओरडा ऐकून शेतकरी हातात कुर्‍हाड घेउन आला व एकाच घावात त्याने सापाचे दोन तुकडे केले. त्यावेळी तो सापाला म्हणाला, 'अरे दुष्टा ज्याने तुझा प्राण वाचवला त्याचे उपकार असे फेडतोस काय ? ह्या तुझ्या कृतघ्नपणाला मरणापेक्षा काहीतरी कडक शिक्षा असायला हवी होती.'

तात्पर्य

- कित्येकजण स्वभावतः इतके दुष्ट असतात की, ज्यांच्या कृपेने त्यांना श्रीमंती व शक्ती प्राप्त होते त्यांच्याच जीवावर उठून वेळ पडल्यास त्यांचा नाश करण्यासही ते कमी करीत नाहीत.
« PreviousChapter ListNext »