Bookstruck

कुत्रा आणि घंटा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका माणसाचा एक कुत्रा होता. तो कुत्रा प्रत्येकाच्या अंगावर धावून जात असे म्हणून त्या माणसाने कुत्र्याच्या गळ्यात एक घंटा बांधली होती. ती घंटा म्हणजे एक मोठे भूषणच आहे असे समजून तो मूर्ख कुत्रा शेजारच्या कुत्र्यांचा तिरस्कार करू लागला व त्यांना आपल्याजवळ उभे राहून देईना. एक म्हातारा कुत्रा त्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या गळ्यात ही वस्तू बांधली आहे, तेवढ्याने तू स्वतःला मोठा समजतोस, पण ज्याने ही घंटा तुझ्या गळ्यात बांधली त्याने तो दागिना म्हणून बांधलेली नसून अप्रतिष्ठेची खूण म्हणून बांधली आहे.'

तात्पर्य

- वाईट गुण व वागणूकीमुळे एखाद्या मूर्ख माणसाचे नाव झाले असेल तर त्यातही त्याला भूषण वाटते. कोणत्याही कारणाने मग ते वाईट असो वा चांगले त्यामुळे प्रसिद्धी व्हावी इतकीच त्याची इच्छा असते.
« PreviousChapter ListNext »