Bookstruck

हरिणी व तिचे पाडस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका हरिणीचे पाडस एकदा तिला विचारू लागले, 'आई, तू कुत्र्यापेक्षा चपळ आहेस आणि त्याच्यापेक्षा जलद पळतेस असं असताना कुत्र्याचा आवाज ऐकताच तुला इतकी भिती का वाटते ?' हरिणी त्यावर हसून म्हणाली, 'बाळा, तुझं बोलणं खरं आहे पण कुत्र्याचा आवाज ऐकताच मला भिती वाटते याचं कारण मलाही समजत नाही.'

तात्पर्य

- मुळचाच भित्रा स्वभाव असल्यावर त्याला धीराच्या कितीही गोष्टी सांगितल्या तरी धीर येत नाही.
« PreviousChapter ListNext »