Bookstruck

कोळी आणि चिमणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक चिमणी माशा मारून खात होती. ते पाहून एका कोळ्याला फार राग आला. त्याला वाटले, माशा मारण्याचा हक्क फक्त आपल्यालाच आहे म्हणून त्याने चिमणीभोवती जाळे विणण्यास सुरुवात केली. परंतु, ते तोडून चिमणी उडून गेली. ते पाहून तो म्हणाला, 'पक्षी धरण्याच्या भानगडीत मी उगाच पडलो. ते माझं काम नाही.'

तात्पर्य

- आपले सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता कुठली गोष्ट करू नये.
« PreviousChapter ListNext »