Bookstruck

शेतकरी आणि दैव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एका शेतकर्‍याला शेत नांगरताना शेतात एक मोठा मोहोरांचा हंडा सापडला. तो पाहून त्या शेतकर्‍याला फार आनंद झाला. तो जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून आपल्याला द्रव्य दिल्याबद्दल जमिनीचे आभार मानू लागला. तेव्हा त्याचे दैव त्याला म्हणाले, 'अरे, यावेळी तू या जमिनीचे आभार मानतो आहेस आणि माझी मात्र तुला आठवणही होत नाही. याऐवजी जर हे द्रव्य चोरीला गेलं असतं तर मात्र तू मलाच दोष दिला असतास !'

« PreviousChapter ListNext »