Bookstruck

ससा आणि कुत्रा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक कुत्रा सशाच्या मागे लागला. त्या कुत्र्याला भूक लागली नव्हती, त्यामुळे त्याने तो ससा हाती लागला तरी त्याला मारून खाल्ले नाही. एखादे वेळी त्याला चावावे. त्याचे अंग चाटावे असा खेळ चालवला होता, ते पाहून ससा त्याला म्हणाला, 'अरे, तू माझा शत्रू आहेस की मित्र? जर माझा मित्र असशील तर असं चावतो का ? अन् जर शत्रु असशील तर असं चाटतोस का ?'

तात्पर्य

- जो आपला मित्र आहे की शत्रू आहे, हे कळत नाही त्याच्याशी कोणत्या प्रकारे वागावे हे समजणे कठीण आहे.
« PreviousChapter ListNext »