Bookstruck

मारुती भाऊ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
"बजरंगी भाईजान" ने प्रेरीत होऊन त्याचा मराठी रिमेक बणवायचे एका मराठी चित्रपट निर्मात्याने घोषित केले आहे.
चित्रपटाचे नाव "मारुती भाऊ" असे असेल आणि मुंबईत हरवलेल्या पुणेकर मुलीला एक मुंबईकर कशी मदत करतो हे दाखविले जाईल.
पुण्यात मुलीला सोडताना त्याला ज्या अडचणी येतात, जसे की तुसडेपणाने बोलणारे पुणेकर, पत्ता विचारल्यावर तोंड वाकडं करणारे पुणेकर अशा अनेक अडचणी दाखविल्या जातील.
याशिवाय एक विशेष साहस द्रुष्य असेल ज्यात सिग्नल तोडुन नो एन्ट्री मधे घुसणार्या एका पुणेकराच्या दुचाकी पासुन मारुती भाऊ त्या मुक्या मुलीला वाचवतो.
चित्रपटाचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा असेल जेव्हा मारुती भाऊ, मुलीला तिच्या घरी सोडतो आणि तिचे आई वडील मारुती भाऊला "काय हो, दुपारी घरी यायची वेळ आहे काय? यायचे होते तर १ च्या आधी कीवा ४ च्या नंतर यायचे नं" असे म्हणत खेकसतात.
« PreviousChapter ListNext »