Bookstruck

छत्रपती शिवाजी महाराज

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
२२ हजाराची फौज घेउन
आलेला खान त्यामागोमाग
३२००० फौज घेउन आलेला
सिद्दी जोहर,

६०००० च्या आसपास फौज
घेउन उतरलेला शाहिस्तेखान
ह्या सगळ्यात मराठी राज्य
चिरडले गेले होते..

पुढे मिर्झाराजा सुद्धा लाख भर
फौज घेउन दख्खनेत उतरला.

एवढे प्रचंड ओझे राज्यावर
असताना १ तप यातना भोगून, 
जाळपोळ, नासधूस, नुकसान
सहन करून ही जनतेची निष्ठा
तसू भर देखील कमी का झाली
नाही ???

या लोकांना राजांनी
असे काय दिले होते ???

बाजी प्रभु असो नाही तर
शिवा काशिद तानाजी असो ।

नाही तर मुरारबाजी..

ह्या सर्वात एक विलक्षण
साम्य आहे माणसे लढताना
मरतात ही लढाई मधली
नित्याची बाब आहे..

पण जाणीव पूर्वक आपण
मरणार याची खात्री असताना,

केवळ मरण्यासाठीच लढतात
ही अभुतपुर्व गोष्ट आहे..

ह्या माणसांना मरण्याची
प्रेरणा कुठून मिळते ???

अशी कोणती गोष्ट, कोणता
विश्वास त्यांच्या मनात निर्माण
झाला होता कि, त्यांनी मरणाला
सुद्धा आनंदाने मिठी मारली..??

ह्या सर्वांचे कारण एकच..

"छत्रपती शिवाजी महाराज" !

न भूतो न भविष्यती..
« PreviousChapter ListNext »