Bookstruck

अंगावर रोमांच (अंगाला काटा येणे) का निर्माण होतात ?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
रोमांच (Goose pimples) शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतात. जेव्हा शरीराला थंडी वाजते किवा आपण एखाद्या गोष्टीला भितो तेव्हा शरीरावरील केस उभे राहतात ज्यामुळे या केसांच्या मधून फिरणाऱ्या हवेचे एक कवच (insulation) निर्माण होईल. प्रत्येक केस का त्वचेला त्याच्या मुळाने जोडलेला असतो. या मुळाच्या खाली छोटे छोटे स्नायु असतात जे थंडी / भीतीच्या वेळी आकुंचन पावतात. हि प्रक्रिया आपणांस त्वचेवर निर्माण होणाऱ्या बारीक पुरळ वरून समजेल. ह्या स्नायूच्या अकुंचनामुळे उष्णता निर्माण होते.
« PreviousChapter ListNext »