Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 38

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्यांनाच बळी पुरवावे लागत. ही सक्ति अत्यंत अमानुष व निर्दय होती. स्वत:बदली दुसरा एकादा बळी ज्यांना पाठवितां येत नसे, ते या धोरणाविरुध्द कडक टीका करूं लागले. सक्तीविरुध्द देशांत सर्वत्र बंडाळी होऊं लागली, दंगेधोपे होऊं लागले. न्यूयॉर्कमध्यें हे दंगे बरेच दिवस चालू राहिले व त्यात हजारों लोक मरण पावले. या अन्तर्गत युध्दांतल्या अनेक लढायांपैकीं नागरिकांची सरकारशीं झालेली लढाई महत्त्वाची असूनहि बहुतेक इतिहासकारांनीं तिचा उल्लेख देखील केलेला नाहीं ! युध्दाबद्दल संपूर्ण सत्य सांगणें फायद्याचें नसतें व तें कोणास आवडतहि नाहीं.

जेव्हां लिंकन प्रेसिडेंटशिपसाठी उभा राहिला, तेव्हां दाक्षिणात्य म्हणाले कीं, लिंकन अध्यक्ष म्हणून निवडून आला तर आम्ही फुटून निघूं, उत्तरेकडच्या संस्थानांपासून अलग होऊं.'' लिंकन निवडून आला आणि दाक्षिणात्यांनीं दिलेली धमकी खरी केली. त्या अन्तर्गत युध्दाचा इतिहास सर्वांना माहीत आहेच. ती हकीकत येथें सांगण्यांत अर्थ नाहीं. लिंकन गुलामगिरीच्या विरुध्द होता. पण गुलामगिरी रद्द करण्यासाठीं तें युध्द नव्हतें. आरंभींचा त्याचा उद्देश बंडखोर संस्थानांना पुन: संयुक्त संस्थानांत आणणें हा होता. प्रेसिडेंट निवडून आल्यामुळें जी गोष्ट झाली होती, ती दूर करण्याकरतां तो हत्यार हातीं घेऊन उभा राहिला. युध्द सुरू होऊन दोन वर्षे झाल्यावर गुलामगिरीचा प्रश्न अधिक प्रामुख्यानें पुढें आला. युरोपांतील तटस्थ राष्ट्रांची सहानुभूति मिळावी, त्याचप्रमाणें स्वत:च्या राष्ट्राची नैतिक भूमिका अधिकच उच्च दिसावी म्हणून गुलामगिरी रद्द करण्याच्या प्रश्नास लिंकननें महत्त्व दिलें. दक्षिणेकडचीं संस्थानें केवळ राजकीय बाबीसाठीं भांडत होतीं, तोंपर्यंत युरोपियन राष्ट्रें केवळ तटस्थ होतीं. कांहीं तटस्थ राष्ट्रें तर म्हणत होतीं कीं, अमेरिकेंतील संस्थानें इंग्लंडपासून फुटून निघालीं, त्याचप्रमाणें त्यांना स्वत:च्या संघांतूनहि फुटतां येईल. पण १८६३ च्या जानेवारीच्या पहिल्या तारखेस ही लढाई नीग्रोंना अमेरिकेंत सुरक्षितपणें राहतां यावें यासाठीं असल्याचें लिंकननें जगाला जाहीर केलें. त्याच्या या घोषणेनें जगाची सदसद्विवेकबुध्दि जागी झाली. मागील महायुध्दांत प्रेसिडेंट वुइल्सन यानें १९१७ सालीं 'जग लोकशाहीसाठीं बिनधोक व निर्वेध करण्यासाठीं हें युध्द आहे' असें जाहीर करून जगाची सहानुभूति आपल्याकडे ओढून घेतली, तसेंच लिंकननेंहि केलें होतें. 'नीग्रोंचा उध्दार करावयाचा आहे' या घोषणेमुळें कांहींचा इच्छित परिणाम झाला. त्यामुळें युरोपचीच सदसद्विवेकबुध्दि जागृत झाली असें नव्हें, तर स्वत: लिंकनचीहि विवेकबुध्दि जागृत झाली. हुषार राजकारणी पुरुष आतां उदात्त महापुरुष झाला. 'एक महनीय ध्येयासाठीं झगडणारा' असें तेजोवलय त्याच्याभोंवतीं पसरलें. स्वत:ची इच्छा नसूनहि किंवा मनापासून तसें वाटत नसतांहि 'मानव-जातीचा एक परित्राता-उध्दारकर्ता'' म्हणून त्याचें नांव इतिहासांत अजरामर झालें.

« PreviousChapter ListNext »