साद मातृभूमीस्

[9:15 AM, 10/15/2017] +91 75065 82341: भारत...या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली .बराचसा परकीय सत्तासंघर्ष पाहिला आणि सोसला आहे या भारताने . इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामीतून मुक्त होण्याकरता कित्येकांना बलिदान द्यावे लागले .  भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत, पिछाडीवरून - आघाडीवर येताना , देशाने साजेशी अशी प्रगती नक्कीच केली आहे . भारत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण, व्यापार-उद्योग, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, वाहतूक-दळणवळण इ. क्षेत्रांत दिवसेंदिवस पुढे सरसावत आहे .