Bookstruck

तीन मुले 60

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘तू ये ना माझ्या घरी.’ आजी म्हणाली.
‘कुठे आहे तुझे घर?’
‘समुद्रावर.’

आई रागावेल. परवा मी लांब गेलो खेळत तर आईने मारले; जाशील का पुन्हा लांब, तंगडं मोडून टाकीन म्हणाली.’
‘माझ्याकडे राह्यला येतोस?’

‘मला नेता?’
‘हो.’
‘मी थोडा वेळ राहीन. मग परत येईन.’
‘नेहमीच माझ्याजवळ राहा.’

‘नाही रे बुवा. आई हवी जवळ.’
‘आई मारते ना?’
‘तरीसुध्दा ती हवी.’

‘सोन्या, जा बाहेर खेळा. रुपल्याला रडवू नको. फुले फार तोडू नको. जा.’ मुले बाहेर गेली. म्हातारी आता जायला निघाली.
‘येत जा मधुरी माझ्याकडे. मुलांना घेऊन येत जा. तू माझी मुलगीच जणू झाली आहेस.’ ती म्हणाली.

‘आजी, आमच्याकडे राहायला येतेस? ये ना.’
‘नको. मी आहे तेथेच बरी. हातपाय चालत आहेत तोपर्यंत चिंता नाही. जाते हो मी.’ असे म्हणून ती गेली. दारापर्यंत मधुरी पोचवायला गेली.

असे दिवस जात होते. मुले वाढत होती. मंगा खपत होता मधुरी कामाला जात असे. संसार चालविणे सोपे नाही. सर्वांचे श्रम तेथे लागत असतात. मधुरीला व मंगाला दोन्ही टोके मिळविणे प्राप्ती व खर्च यांची तोंडमिळवणी करणे जड जाई. तरीही दोघे. आनंदाने राहात होती.

« PreviousChapter ListNext »