Bookstruck

तीन मुले 86

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘बाबा, तुम्ही काय आणाल हो तिकडे जाऊन?
‘याच्याहून मोठे शंख आणाल?
‘मी मोती कवडया आणीन, मोती.

‘बाबा, मोती म्हणजे तरी अशीच ना?
‘तिकडे का मोती किना-यावर येऊन पडतात?’
‘मला माहीत नाही हो बाळ.’
‘आई, चल ना घरी.’

‘सोन्या, तू येथेच राहा.’
‘आई राहते का?’
‘नाही. पण तू राहा. मी येथे एकटी आहे. मला सोबत राहा. मला रात्री भीती वाटते. चोर आले तर तू त्यांना काठीने हाकल. राहतोस का?’

‘परंतु चोर येईल कशाला? तुमच्याकडे आहे तरी काय? श्रीमंताकडे चोर येतात आजी.’
‘मी श्रीमंतच आहे सोन्या.’
‘आणि मग अशी कशी झोपडी?’
‘आई, चल ना, भूक लागली.’

‘बरे चला. आजी, जातो आता आम्ही.’
‘दिवस ठरला ना मंगा?’
‘हो परवा जायचे. परवा सकाठी आठ वाजता हाकारणार आहे गलबत.’
‘जाताना भेटून जाशीलच.’

‘हो, परंतु त्या वेळेस बोलवणार नाही, म्हणून आज आलो.’
निघाली सारी मंडळी. मंगाने मनीला घेतले होते. मुले बरोबर उडया मारीत चालली होती.

‘बाबा, मला घ्या उचलून, मी दमलो आहे.’ रुपल्या म्हणाला.
‘तू का लहान रुपल्या?’ मधुरी म्हणाली.
‘घ्या ना बाबा.’

« PreviousChapter ListNext »