चांगली विचारधारा

लेखिका - योगिता जाधव

  • जिंकण म्हणजे काय ते  हरल्याशिवाय कळत नाही.
  • दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.
  • सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही.
  • समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.
  • मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.
  • आपली माणस कोण ते संकटांशिवाय कळत नाही .
  • सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.
  • उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही.
  • जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही.
  • काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.
  • मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही.
  • चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.