Bookstruck

मी व राजकारणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

लेखिका - योगिता किरण पाखले

ओळखलत का राजकारन्यांनो गरीबीत वाढलोय मी
कपडे आहेत फाटलेले  छप्पर ही उडालेले
क्षणभर देता सुख हे मतांसाठी तुम्ही
पडला दुष्काळ अन पूर संपले सारे काही
माहेरवाशीन पोरीसारखे आले येथे तुम्ही
मोकळ्या हाती जाल कसे  लुटले जणू रम्मीत
सुख सरले,आनंद विझला,सर्व काही संपले
डोळ्यातल्या पापण्यात मात्र आसू तेवढे राहिले
परिवाराला घेऊन आता लढाई लढतो आहे
डोळ्यातील आसवांना धीराने थांबवतो आहे
पेटीत तुमचा हात जाताच
मन मिस्कीलतेने हसले
धन नको साहेब आता स्वाभिमान दुखला
होरपळला जरी संसार आता मोडला नाही बाणा
अपेक्षा ही मतदाराची तुम्ही आता पूर्ण करा.

« PreviousChapter ListNext »