Bookstruck

जिम कोर्बेट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जिम कोर्बेट एक जागा प्रसिद्ध शिकारी होते. ब्रिटीश आर्मीत कर्नल म्हणून ते कार्यरत होते आणि आपल्या जीवनात त्यांनी सुमारे ३३ वाघांची शिकार केली त्यातील सुमारे १८ वाघ नरभक्षी होते. १९०८ ते १९३८ पर्यंत जिम कोर्बेट नाराभाक्षी वाघांची शिकार करण्यासाठी भारत भर फिरत होते. वाघांना जंगलात शिरून शोधून मारण्यात त्यांचा इतका हाथखंडा होता कि उत्तर प्रदेश ते कर्नाटक पर्यंत विविध संस्थानिक त्यांना आपल्या राज्यातील वाघांची शिकार करण्यासाठी आमंत्रित करत असत.

चंपावत भागांत एका वाघाने ४०० लोकांचा बळी घेतला होता. जिमने  वाघाची शिकार केली. १९२६ मध्ये जिमने रुद्रप्रयाग बिबट्याची शिकार केली ८ वर्षे ह्या बिबट्याने केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेकरूंचा जीव घेतला होता. सुमारे १२६ भक्तांचा बळी घेतलेला हा बिबटा शेवटी जिमच्या गोळीचा शिकार झाला.

आजकाल जंगली श्वापदे फारच कमी झाली असली तरी त्या काळी तशी परिस्थिती नव्हती. जिम केवळ शिकारी नव्हता पण तो जंगले आणि जनावरे ह्यांचा प्रेमी सुद्धा होता. जिम देशभर फिरून लोकांना जंगले आणि जनावारंचे रक्षण करण्याचा सल्ला द्यायचा. १९२० साली जिमने एक केमेरा घेतला आणि जंगलचे फोटो काढण्याचा प्रयत्न केले पण त्याला ते साध्य झाले नाही. पण त्याची पुस्तके मात्र पर्सिध्द झाली. जिम कॉर्बेटची पुस्तके जगप्रसिद्ध आहेत . ती वाचताना जणू आपण स्वतः जंगलात वाघाच्या मागावर आहोत असा भास होतो. 

जिम कोर्बेट १९४८ साली निवृत्त होवून केनिया मध्ये स्थायिक झाले. ५ फेब्रूअरी १९५२ मध्ये राजकन्या एलिजाबेथ त्यांना भेटायला केनियात होती आणि त्यांनी आपली रात्र जिम ने बदलेल्या एका मचाणावर घालवली, त्याच रात्री राजकन्येचे वडील जॉर्ज मृत्यू पावले. ह्या घटनेच्या बाबतीत जिमने लिहिले होते

"जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच कदाचित असे घडले असेल कि एक सुंदर मुलगी झाडावर चढली आणि जीवनातील एक थरारक अनुभव घेवून ती जेंव्हा खाली एक सम्राज्ञी बनून उतरली"

आपले शेवटचे ६वे पुस्तक लिहून कोर्बेत हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू पावले. त्यांचे अंत्य संस्कार केनया मधील न्येरी गावांत झाले. तेथील त्यांचे घर मोती महाल आज सुद्धा पाहायला भेटतो. त्याशिवाय त्या गावासाठी त्यांनी स्वखर्चाने बांधलेली कोर्बेट भिंत सुद्धा पाहायला भेटते. हि भिंत गावाचे रक्षण (जंगली श्वापादापासून) करण्यासाठी त्यांनी बनवली होती




« PreviousChapter ListNext »