Bookstruck

इंदूर 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“खरेच. मला वाटले की पाहुण्यांसाठी तू म्हणत आहेस.”

“आणि देशभक्तांना आता फुलांचे हार नाही आवडत. सुताचे आवडतात. स्वच्छ सुंदर सुताचे.”

“मग तुझ्या सुताची लडी ने की बरोबर.”

“खरेच नेऊ?”

“काय हरकत आहे?”

“नुसत्या सुताचीच? का ती जरा सजवू?”

“तुला आवडेल तसे कर.”

“पण नको बाबा. तुम्हा हंसाल, ते पाहुणे हंसतील.”

“हंसतील त्यांचे दात दिसतील.”

“मग करते हो सुताचा हार.”

“पण घालणार कोणाला?”

“खरेच, ती तिघेजण आहेत.”

“गुणाला घाल. आईबाप वृद्ध आहेत, त्यांना कशाला?”

“किती छान त्यांचे नाव. गुणा! तुम्ही ज्या दिवशी ते नाव मला सांगितलेत त्या दिवसापासून ते कानांत गुणगुणत आहे. गुणा! कितीसोपे, साधें, सुंदर नाव.”

“इंदु नाव वाईट आहे वाटते?”

“इंदुहि चांगले आहे.”

« PreviousChapter ListNext »