Bookstruck

संध्या 18

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“हो.”

“ते पाहा आकाश. कसं रंगलं आहे.”

“संध्याकाळ होत आली म्हणजे आकाश रंगतं.”

“मी आतां जातों.”

“कुठं ?”

“घरीं सुपाणीला.”

“आलेत कां नि चालतेत कां ?”

“ज्या कामासाठीं आलो होतो ते झाल.”

“कोणतं काम ?”

“तुझं नांव विचारायच.”

“या झाडाखालीं झोपून माझ नांव कळणार होत वाटतं ?”

“सारा गांव भटकलों व इथ येऊन निराशेनं झोपलो.”

“आणि इथं आशा सफल झाली. या झाडाखालीं आपली भेट झाली. “

“संध्ये ?”

“काय ?”

“आतां आपण परत कधीं भेटू ?”

“असेच येत जा.”

“मी उद्यां पुण्याला जाणार.”

“कां ?”

“शिकायला ?”

“शिका, खूप शिका.”

“शिकून काय करूं ?”

“ते मी काय सांगूं ?”

“पुण्याला गेल्यावर काय होतं पाहावं. माझ्या मनांत अनेक विचार येतात.”

“कसले विचार ?”

“देशासाठी तुरुंगांत जावं, देशासाठीं मरावं.”

“देशासाठीं जगा, देशासाठीं झिजा.”

“कां जगावं, कसं झिजावं ?”

“तें पुण्याला गेल्यावर तुम्हांला कळेल.”

“संध्ये ?”

“काय ?”

“माझं नांव काय ?”

“कल्याण.”

“माझं नांव विसरणार नाहींस ?”

“नाहीं. “

“खरंच ?”

“हो; आणि माझं नांव ?”

“तुझं नांव संध्या. मी तें विसरणार नाहीं.”

“आपण अजून लहान आहोत. तुम्ही लहान आहांत.”

“पुढं मोठीं होऊ.”

« PreviousChapter ListNext »