Bookstruck

परस्पर संवादात्मक व्यक्तिमत्व प्रकार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जी भुते जगातील माणसांशी संवाद साधू शकतात त्यांना परस्पर संवादात्मक व्यक्तिमत्त्व प्रकार असे म्हंटले जाते. बरेचदा ही भुते ज्याला दिसतात त्याचे मृत मित्र किंवा नातेवाईक असतात पण काही वेळेस अनोळखी माणसांची भुते सुद्धा असू शकतात. ती भुते बुद्धिमान आणि माहितगार असतात आणि या जगाच्या वेळ आणि प्रसंग यानुसार बोलतात. त्यांचे रूप दृक, श्राव्य किंवा टेलीपथिक असू शकते. बऱ्याच वेळेस ते या जगातील जिवंत लोक आणि वस्तू यांना स्पर्श देखील करतात.

 

हि भुते अनेक वेळा आपले अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांच्या जीवनाशी निगडीत अशा सुगंधाचा समावेश करून घेतात उदा.  तंबाकू किंवा इतर कोणताही ओळखीचा सुगंध.जीवंत माणसांप्रमाणे हि भुते आपल्या वेगवेगळ्या भावना प्रदर्शित करू शकतात उदा. मस्ती, प्रेम, राग किंवा भीती. साहजिक आहे भुतांच्या स्वभावानुसार ही भेट सुखद किंवा भयानक असू शकते.

 

परस्पर संवादात्मक व्यक्तीमत्व प्रकार या श्रेणी अंतर्गत अनेक उपश्रेणी सुद्धा असू शकतात जी भूत ज्या व्य क्तीला साक्षात्कार देत असते त्याच्यानुसार ठरते. जर व्यक्ती भुताला आपल्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या रुपात ओळखत असे तर ते भूत त्याचे रूप घेते तेव्हा त्याला कौटुंबिक व्यक्तिमत्व असे मानले जाते. या श्रेणी अंतर्गत पती किंवा पत्नी, आई वडील, भाऊ बहिण किंवा जवळचे मित्र यांचा अंतर्भाव होतो कारण त्यांचे दर्शक व्यक्तीशी जवळचे नाते असते. आजपर्यंत पाहणीत आलेल्या भूतांमध्ये हा प्रकार सर्वांत सामान्य आणि कमी वेळेकरिता साक्षात्कार देणाऱ्या भूतांचा प्रकार आहे. असे साक्षात्कार फक्त निरोप घेण्यापुरते किंवा दु:खी कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दिले जातात. हि भुते एकदाच दिसतात त्यामुळे त्यांचा आलेख बनवणे कठीण आहे.

« PreviousChapter ListNext »