Bookstruck

जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : ब्राउन लेडी ऑफ़ रायन्हम हॉल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भुताटकीच्या गोष्टीसाठी सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय चित्र आहे नॉरफोक इंग्लंड मधील डोरोथी टाऊनसेंट हिच्या घरातील रायन्ह्म हॉल मध्ये त्याच्या भुताची असलेली आकृती ज्याला ब्राऊन लेडी असे नाव दिले आहे.

१८३५ पासून रायन्ह्म हॉल मधून नेहमीच भुतांच्या गोष्टी ऐकिवात आहेत. अशी एक गोष्ट आहे ज्यात कप्तान फ्रेडरिक मार्र्यट याने चार्ल्स टाऊनसेंट याला दोन पुतण्यासाहित एका भुताचे दर्शन केले. ते तिघे एका कोरीडोरमध्ये होते तेव्हा त्यांच्या जवळून एक बाईचे भूत चालत गेले. कप्तान मार्र्यत याने प्रसंगावधान साधून तिच्यावर गोळी झाडली त्याचा काही उपयोग झाला नाही. गोळी त्या बाईच्या आरपार गेली आणि तिच्या मागे असलेल्या दरवाज्यात घुसली.

१९३६ मध्ये एका फोटोग्राफरला घराच्या आतले फोटो काढण्याचे का दिले गेले. तो फोटोग्राफर इंद्रा शिरा याने घराच्या मुख्य जिण्याचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे वाफेसारखी आकृती दिसली. त्याने आपल्या शिष्याला त्या दिशेचा फोटो घेण्यास सांगितले पण शिष्याला ती आकृती दिसत नव्हती जी जिन्यावरून खाली उतरत होती. हा फोटो इतिहासातील सर्वात विश्वसनीय भुताटकीचा फोटो मानला  जातो

« PreviousChapter ListNext »