Bookstruck

जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : क्रेइस्चेर मेन्शन –स्टेटन आइलैंड न्यू यॉर्क

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

न्यू यॉर्क येथील क्रेइस्चेर परिवार १८०० मध्ये एका मोठ्या वीट भट्टीचा मालक होता जो पूर्ण स्टेटन आयलंड क्षेत्रात विटा पुरवत असे. या धंद्यातून झालेल्या फायद्यात त्यांनी दोन मोठी घरे बांधून घेतली. एक कुटुंबातील मूळ सद्स्यासाठी व दुसरे त्यांचा मुलगा आणि नवीन पत्नी साठी.

 

त्या बाप-बेट्यात त्यावेळीस चाललेली भांडणे शिगेला पोहचली आणि नाते पुन्हा पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत नव्हती. एका संध्याकाळी दुसऱ्या घरात ज्यात मुलगा आणि नवीन पत्नी राहत असे त्यात अचानकपणे आग लागली आणि पूर्ण घर जळून खाक झाले त्यात मुलगा आणि पत्नी मृत्युमुखी पडले. घराची पुन्हा निर्मिती केली आणि त्या ठिकाणी एक रेस्टोरंट सुरु केले गेले. असे म्हणतात कि आजही या घरात मुलगा त्याची आई आणि एक आचारी ज्याने १९ व्या शतकाच्या सुरवातीला आत्महत्या केली होती यांची भुते आढळतात. या इमारतीत नेहमीच भुते दिसतात आणि त्यांचे आवाज ऐकू येत असतात.

 

रेस्टोरंट आणि इमारतीतील अनेक पाहुणे आणि कर्मचारी यांना चित्रविचित्र भुते दिसल्याचा ते दावा करतात. त्याचप्रमाणे दरवाजे आपोआप बंद होणे, वस्तू हवेत उडणे अशा खबरा ऐकू येत असतात. या इमारतीच्या नव्या मालकांनी रोज नवे भुताटकीचे अनुभव ऐकल्याचे मान्य केले आहे.

 

« PreviousChapter ListNext »