Bookstruck

*कलिंगडाच्या साली 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“ठीक. पोलिस आ जाय तो अच्छा होगा. मैं जल्द जाऊं और पोलिस लेकर आऊं. आप सो जाईये. फिकीर नहीं करना शेटजी. लाला जिन्दा है तो सब ठीक है.”

शेटजी पलंगावर पडले. लाला तंबूबाहेरच्या खाटेवर पडला. मोठ्या पहांटे उठून तो जवळच्या पोलिसठाण्याकडे जायला निघाला. आतां उजाडलें. आदिवासी उठले. परंतु कामाला जायचें लक्षण दिसेना. आठ वाजले तरी तेथेंच होते. धनजीशेट आले. ते म्हणाले,

“काम नहीं करते ? मस्ती आली ?”

“शेट, शिवी देऊं नका. कबूल केल्याप्रमाणें आमची मजुरी आधीं चुकती करा. मग कामाचे बघूं.”
“कामांत कसूर नि ठरलेली मजुरी मागते ?”

“मजुरी द्या.”

“आधीं कामावर जा.”

“आधीं मजुरी. तेवढी मजुरी तुम्हांला परवडत नसेल, तर आम्हीं येथून जातों. परंतु झालेल्या कामाची मजुरी चुकती करा. नाहींतर सार्‍या जिल्ह्यांत संप पसरेल. तुमचेंच नाहीं, तर कोणाचेंच गवत कापलें जाणार नाहीं. बसा बोंबा मारीत.”

“आणि साले तुम्हीं खाल काय ?”

“त्याची तुम्हांला नको काळजी.”

तिकडे शुक्री उभी होती. रानांतील फुलें तिनें केंसांत घातली होतीं. काळीसांवळी तेजस्वी शुक्री. धनजीशेट तिच्याकडे पाहात होता.

“ती शुक्री तुझी बायको ना रे ?  ती बघ जणुं मुंबईवाली झाली आहे गवत कापणारी ; परंतु ऐट बघा तिची. केंसांत फुलें –” धनजीशेट बोलले.

“मग का तुमच्या बायकांनींच फुलांनीं सजावें ?” मंगळ्या म्हणाला.”

“साला आमच्या बायकांचें नांव काढतो ? याद राख दांत पाडीन. मस्ती लई आली तुला होय? तुरुंगात घालीन. तूंच म्होरक्या आहेस. ताडी पितोस, शुक्रीला मारतोस म्हणे. अधिक मजुरी हवी. तुझ्यासारख्या कुत्र्याला शुक्रीची काय किंमत ? ती बंगल्यांत हवी. तिला गुलाब मिळतील. मस्त राहील.”

« PreviousChapter ListNext »