Bookstruck

चिरस्थान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

क्लिओपात्राच्या मृत्यूनंतर तिने घेतलेल्या चिरविश्रांतीचे ठिकाण शोधण्याचे आत्तापर्यंत अनेकांनी प्रयत्‍न केले आहेत. प्रसिद्ध इजिप्शियन पुरातत्त्वज्ञ डॉ. झही हवास आणि डॉमिनीकन रिपब्लिकची पुरातत्त्वज्ञ डॉ. कॅथलिन मार्टीनेझ यांनी अलिक्झांड्रियाच्या पश्चिमेला ५० किलोमीटर अंतरावर असणार्‍या तापोसिरीस मॅग्ना या मंदिरातच अँटोनी आणि क्लिओपात्राची चिरविश्रांतीस्थाने आहेत असा दावा केला आहे.[२] प्लुटार्कने उल्लेख केल्याप्रमाणे अँटोनी आणि क्लिओपात्राची दफने जवळजवळच आहेत या मतांचा त्यांनी आधार घेतला. हे तापोसिरीस मॅग्ना मंदिर ओरीसिस या देवतेचे असून तिला राक्षसाने मारून तिचे चौदा तुकडे इजिप्तच्या भूमीत फेकून दिले होते. हे ओरीसिसचे चौदा तुकडे जिथे जिथे पडले त्या त्या ठिकाणी इजिप्तमध्ये ही ओरीसिसची मंदिरे आहेत. त्यापैकीच तापोसिरीस मॅग्ना हे एक आहे. या मंदिराचे उत्खनन करतेवेळी डॉ. झही आणि मार्टिनेझ यांना त्या ठिकाणी अलेक्झांडर द ग्रेट याचे एक नाणे आणि क्लिओपात्राच्या चेहर्‍याचा मुखवटा सापडला आणि त्यावरून हे मंदिर चौथ्या टॉलेमीच्या काळात २००० वर्षांपूर्वी बांधले गेले असल्याचे त्यांनी सिद्ध केले.[३] या पुरातत्त्ववेत्त्यांनी रडारचा वापर करून या मंदिरात खाली २५ ते ३० मीटर खोलीवर तीन ठिकाणे शोधली. त्यांपैकी एका ठिकाणी क्लिओपात्राचे दफन झालेले असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

« PreviousChapter List